Posts

Showing posts from August, 2016

‘जलयुक्त शिवार’ लोकचळवळ व्हावी

‘जलयुक्त शिवार’ लोकचळवळ व्हावी राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी विविध कारणांनी निर्माण होणाºया पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जलयुक्त शिवार' अभियान ही नवी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहे. या योजनेद्वारे 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खºया अथार्ने क्रांतिकारीच म्हणावा लागेल. मागील काही दिवसात जेव्हा पासून या योजनेवर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हांमध्ये अमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेचे चांगले परिणाम देखील आता दिसू लागले आहेत. मात्र अद्याप देखील ही योजना जास्तीत जास्त लोकांना जोड़ण्यात तितकी यशस्वी होउ शकलेली नाही. मात्र राज्य शासण आणि प्रसारमाध्यमांना मेहनत घेउन या साठी अजुन प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात सतत उद्भवणारी पाणी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत 'जलयुक्त शिवार' अभियान रा