‘जलयुक्त शिवार’ लोकचळवळ व्हावी


‘जलयुक्त शिवार’ लोकचळवळ व्हावी
राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी विविध कारणांनी निर्माण होणाºया पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जलयुक्त शिवार' अभियान ही नवी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहे. या योजनेद्वारे 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खºया अथार्ने क्रांतिकारीच म्हणावा लागेल. मागील काही दिवसात जेव्हा पासून या योजनेवर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हांमध्ये अमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेचे चांगले परिणाम देखील आता दिसू लागले आहेत. मात्र अद्याप देखील ही योजना जास्तीत जास्त लोकांना जोड़ण्यात तितकी यशस्वी होउ शकलेली नाही. मात्र राज्य शासण आणि प्रसारमाध्यमांना मेहनत घेउन या साठी अजुन प्रयत्न करण्याची गरज आहे.
राज्यात सतत उद्भवणारी पाणी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत 'जलयुक्त शिवार' अभियान राज्य शासनाने हाती घेतले. 2014-15 मध्ये भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या 188 तालुक्यातील 2 हजार 234 गावे तसेच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यातील 19 हजार 59 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येत आहे. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला आहे. या अभियानात विविध विभागाकडील योजना, अशासकीय संस्था आणि लोकसहभाग यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यात कोकण आणि विदर्भात सर्वात जास्त जंगल आणि नद्या असल्याने या ठिकाणी पाण्याची टंचाई नसावी असे वाटत असते. मात्र या उन्हाळ्यात याच भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे विदर्भात देखील जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मोहिम चालविण्याची आवश्यकता है.
अपुºया आणि अनियमित पावसामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या बाबी राज्याच्या विकासात एक आव्हान ठरत आहेत. राज्यात गेल्या चार दशकात पाण्याच्या पुरेशा उपलब्धते अभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येवू लागला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी हे अभियान फार महत्वाची भुमिका पार पाडू शकते. मात्र केवळ शासकीय यंत्रणेच्या भरवश्यावरच ही योजना पूर्णत्वास येवू शकणार नाही. हे अभियान उत्तम प्रकारे राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे निर्माण होईल अशी मला आशा आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी जलसंधारणाच्या राबविलेल्या विविध प्रणालीमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही जे साध्य करू शकलो तेच 'जलयुक्त शिवार' अभियान राबवून करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला खुप गांभीर्याने घेतल्यानेच आज या योजनेचे चांगले परिणाम देखील दिसू लागले आहेत. मात्र गावकºयांचा जितका सहभाग यात असेल तितकीच ही लोकचळवळ म्हणून राबविली जाण्याची शक्यता आहे.
- फहीम खान.
fahim234162@gmail.com
faheem,khan@lokmat.com
8483879505

 

Comments

Popular posts from this blog

कौन रोकेगा, ये दक्षिण गढ़चिरोली का "लाल सलाम" ?

कैसे कहूं मैं... नेता तुम्हीं हो कल के

आता स्टेटस पुरताच उरला गुलाब...