मकाऊची प्रेम-गल्ली: त्रावेसा दा पैशाओ
- फहीम खान, सीनियर जर्नलिस्ट, नागपुर परक्या देशात फिरताना काही क्षण असे येतात जे तुमच्या अंतःकरणात खोलवर घर करतात. मकाऊच्या रस्त्यांवर फिरताना एक असाच क्षण माझ्याही आयुष्यात आला — त्रावेसा दा पैशाओ या एका गूढ, देखण्या आणि प्रेमाने भारलेल्या गल्लीत. त्या दिवशी मी Ruins of St. Paul's या ऐतिहासिक स्थळावरून खाली उतरत होतो. समोर दिसणारी गर्दी, कॅमेऱ्यांचे फ्लॅश, आणि पर्यटकांची वर्दळ थोडी मागे टाकून, उजव्या बाजूला दिसलेल्या एका लहानशा गल्लीकडे माझं लक्ष गेलं. रंगीत भिंती, दगडी पायऱ्या, आणि फुलांनी सजलेल्या खिडक्या — ही जागा काहीतरी खास सांगते आहे असं वाटलं. गल्लीत प्रवेश करताच त्या ठिकाणाचं नाव वाचलं — Travessa da Paixão — अर्थात... प्रेमाची गल्ली! त्या गल्लीत शिरल्यावर जाणवलं की इथे वेळेचं भान हरवतं. जणू काही काळाचं चक्र थोडंसं मागे फिरलंय. सगळं काही शांत, संथ आणि सौंदर्यपूर्ण. प्रत्येक भिंत, दरवाजा, खिडकी — जणू एखादं जुने प्रेमकाव्य सांगत होती आणि त्या वातावरणात मी क्षणभरातच हरवून गेलो. त्या गल्लीत एक छोटं, खास सिनेमा थिएटर आहे. आत गेल्यावर लक्षात आलं की इथे पारंपरिक व्यावसाय...
Comments
Post a Comment