आता स्टेटस पुरताच उरला गुलाब...
कधी प्रेम दिनाला माझ्या बागेतील तो गुलाब
फुलायचा फक्त तुझ्यासाठी
सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांमध्ये न्हाहून ताजा होताच
पोहोचायचा झाडावरून माझ्या बॅगेत
कॉलेजात आल्या -आल्याच तो गुलाब तुला भेटायला आतुर असायचा
भेट व्हायची तुझी -त्याची तेव्हा तो हसायचा
मग थेट तुझ्या केसांमध्येच जावून बसायचा
आता ही प्रेम दिनी माझ्या बागेत माझा गुलाब तसाच फुलतो
मात्र तो तुझ्या विना तसाच झाडावर सुकुन जातो...
त्याचे मोबाईल मध्ये काढलेले फोटो तेव्हढे
माझ्या मोबाइलच्या स्टेटस मध्ये खुलून दिसतात...
ते ही फक्त तुझ्याच साठी...
- by फहीम खान, जर्नलिस्ट, नागपुर.
@फहीम खान, जर्नलिस्ट, नागपुर.
fahim234162@gmail.com
Twitter- @FaheemLokmat
Facebook- https://www.facebook.com/fahimkhan7786
Instagram- https://www.instagram.com/fahimkhan_gad/?hl=en
Comments
Post a Comment